पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती येथील प्रस्तावित दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे
1 min read

बारामती, महाराष्ट्र मिरर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती येथील प्रस्तावित दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. बारामतीतील ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ डिसेंबर रोजी त्यांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना दौरा रद्द झाल्याने पूर्णविराम मिळाला आहे. आता १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची तयारी केली जाणार आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




