Skip to content

दुचाकीला कट लागल्याच्या वादातून कोयते हवेत फिरवून दहशत; दोघांना अटक

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न करून कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याची घटना धायरी आणि किरकटवाडी परिसरात घडली.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

दुचाकीला कट लागल्याच्या वादातून कोयते हवेत फिरवून दहशत; दोघांना अटक
पुणे, महाराष्ट्र मिरर : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न करून कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याची घटना धायरी आणि किरकटवाडी परिसरात घडली.

पुणे, महाराष्ट्र मिरर : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न करून कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याची घटना धायरी आणि किरकटवाडी परिसरात घडली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धायरी येथील खडक चौकात फिर्यादीच्या दुचाकीचा आरोपींच्या दुचाकीला कट लागला. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी हत्यार घेऊन फिर्यादीला मारण्यासाठी अंगावर धाव घेतली.

याच वादातून त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरकटवाडीतील नानानगर येथील सोनवणे झेरॉक्स दुकानाजवळ फिर्यादी राहत असलेल्या गल्लीमध्ये आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(४), १९०, १९१(३), ३५२, ३५१(२), १३१, आर्म्स अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती मुक्ताराम मोरे (वय २१, रा. नऱ्हे, पुणे) आणि रोशन राजू लांडगे (वय १९, रा. धायरी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना अटक करण्यात आली असून, तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper