Skip to content

जॅकी श्रॉफ यांची पुणे महापालिकेला सदिच्छा भेट; संभाजी उद्यानात केले वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश आपल्या अनोख्या शैलीत देणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आज पुणे महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश आपल्या अनोख्या शैलीत देणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आज पुणे महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन शहरातील विविध विकासकामे तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

या भेटीनंतर जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते जंगली महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षलागवड आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत त्यांनी नागरिकांमध्ये हरित पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. या भेटीच्या निमित्ताने शहराच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper