Skip to content

गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादात चालकाला दगडाने मारहाण

आरोपीविरोधात आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादात चालकाला दगडाने मारहाण
आरोपीविरोधात आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादातून एकाने वाहनचालकाला दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिंबळी येथील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीत घडली.

स्वप्निल चंद्रकांत सोनकांबळे (२४, भोसरी, मूळ खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवींद्र तबाजी मांडवे (३७, डोंगरकिन्ही, ता. पाटोदा, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी चिंबळी येथील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीत माल भरण्यासाठी गाडी लावली होती. त्यावेळी गाडीच्या भाड्यावरून आरोपीला राग आला. रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत तिथे पडलेला दगड उचलून जोरात फेकून मारला. हा दगड लागल्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper