Skip to content

काळेवाडीत कोयत्याने वार करून तरुणावर हल्ला

पिंपरी: एका तरुणाला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंभर चाळ, काळेवाडी येथे घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

काळेवाडीत कोयत्याने वार करून तरुणावर हल्ला
एका तरुणाला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली.

पिंपरी: एका तरुणाला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंभर चाळ, काळेवाडी येथे घडली.

तुषार राकेश वाल्मीकी (१६, रा. काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव देवीदास गणगोपाळ (१९) आणि गौरव चंद्रकांत साळवे (१९, दोघे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वैभव याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांना आरोपी वैभव याने शिवीगाळ करून डावा हात पकडून मारहाण केली. तुषार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पकडून ठेवले आणि गौरव याने कोयता फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. त्यानंतर हातात कोयता हवेत फिरवून दोघांनी परिसरात दहशत निर्माण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Share