Election Commission On Action Mode : 47 लाख कोणाचे ? कारमधून 47 लाखाची रोकड जप्त
Election Commission on Action Mode निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून मोठी कारवाई ; 47 लाख रोकड मुलुंडमध्ये एका कारमधून जप्त
मुंबई :- राज्यात निवडणुका घोषित झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगाकडून पैशाची हेरगिरी करणाऱ्यांवर चांगलीच नजर ठेवून आहे. निवडणुकीच्या कालावधीत पैशाच्या आमिष दाखवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जातात असा आरोप अनेक वेळा विरोधकांकडून केला जातो. निवडणुकीत पैशाच्या कोणत्याही प्रकारे वाटप होऊ नये याकरिता निवडणूक आयोगाने प्रत्येक विभागात निवडणूक आयोगाचा एक भरारी पथक तैनात केला आहे. या भरारी पथकाकडून प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी केली जाते आणि संशयित गाड्यांवर कारवाई केली जाते. मुलुंड मध्ये भरारी पथक तैनात असताना एका खाजगी गाडीची तपासणी केली असता त्या गाडीतून पोलिसांना आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला (SST) 47 लाख रोकड सापडली. गाडी चालकाला संबंधित पैसा संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने निवडणूक आयोगाने त्या गाडी चालकावर कारवाई केली करत हे पैसे कोणाचे याचा शोध निवडणूक आयोगाकडून आणि पोलिसांकडून केला जात आहे. Election Commission’ On Action Mode
9 मे 2024 रोजी सायंकाळी 05 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बी आर रोड पोलीस चौकीत जवळ कार्यरत असलेल्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका खाजगी वाहनाचे तपासणी केली असता त्या वाहनातून 47 लाख रोख रक्कम आढळून आले त्यानंतर आयकर विभागाने तपासणी करून सदर रोख रक्कम मुलुंड पोलीस ठाण्यात जमा केली आहे.पुढील चौकशी केली जात आहे. Election Commission’ On Action Mode