Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “घर घर तिरंगा”अभियानाचा शुभारंभ
•Eknath Shinde Launches Ghar Ghar Tiranga Campaign ऑगस्ट क्रांती मैदान, गांधी स्मृती येथे अभिवादन करून मुख्यमंत्र्यांचे घरघर तिरंगा संकल्पना अभियानाला सुरुवात
मुंबई :- 15 ऑगस्ट रोजी देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. आज (9 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानातून हे अभियान राबवण्यात सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने 2022 साली पहिल्यांदा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरे आणि आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावण्यात आले होते. राज्याने देखील या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या वतीने अभियान राबविण्यात येणार असल्याचे मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले आहे.
9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील सुमारे अडीच कोटी घरे व आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. याचबरोबरीने या कालावधीमध्ये विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबरीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट, तिरंगा सेल्फी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे.