पुणे / मुंबई, दि. ७ मार्च (महाराष्ट्र मिरर) ED Raid Mahadev App Pune | ED raids Mahadev app panel operators in Pune
अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) (ED Raid Mahadev App Pune) पुण्यात गेल्या दोन दिवसापासून महादेव ॲप संबंधित ऑपरेटर्स व उपकंपनी असलेल्या लोटस 365 संबंधित ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे. पुण्यात बेटिंग ॲपवर छापेमारी झाल्याने खळबळ उडाली आहे.
ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे 1.2 कोटी रुपये रोख, कागदपत्रे, युपीआई आयडी, अकाउंट बुक्स आणि बेटिंग आयडीशी संबंधित इतर डिजिटल पुरावे सापडले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पॅनेल ऑपरेटर आणि संबंधित सहयोगींचे जबाबही नोंदवले.
यापूर्वी ईडीने भोपाळमधून हवाला ऑपरेटर गिरीश तलरेजा याला अटक केली. तलरेजा लोटस 365 कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असून आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि सुभम सोनी यांचा जवळचा सहकारी असल्याचे समजते.
अनेक शेल कंपन्या आणि हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून सट्टेबाजीच्या निधीतून नफा ॲपच्या दुबई कार्यालयाच्या खात्यात वळवला. महादेव ॲपचे अनेक सहयोगी आणि उपकंपनीच्या पॅनेल ऑपरेटर्ससह, सट्टेबाजीच्या पैशाची लाँड्रिंग करण्यासाठी तलरेजा यांच्या संपर्कात होते.