Earthquake In Raigad : रायगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

•रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले
रायगड :- रायगड जिल्ह्यात एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहे.हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असला तरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही.अनेकांच्या घरामधील भांडी हलायला लागली. खिडक्यांची दारे, काचा हलायला लागल्या. त्यामुळे नागरिक घराबाहेर पळून गेले.
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तर सुधागडमधील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ तसेच सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी भूकंप झालेल्या गावांना भेट दिली. या भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.तर नागरिकांनी घाबरु नये तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात काल रात्रीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास पहिला धक्का जाणवला, त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा अनेकांच्या घरातील भांडी पडली, भिंतीवर लटकलेल्या अनेक वस्तू पडल्या. परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. जिल्हा प्रशासन या सदर्भात अलर्ट मोडवर असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.