Drug Paddler Pune | पुण्यात ड्रग्स तस्करांवर धाडसत्र : गुन्हे शाखेकडून ८ ठिकाणी छापा, ७ नायजेरियन ताब्यात
- गुन्हे शाखेची कोंढवा व कोथरूड परिसरात मोठी कारवाई
पुणे, दि. २० मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Drug Paddler Pune |
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांनी ड्रग्स फ्री पुणे संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी व्यापक कारवाई हाती घेतली आहे. गुन्हे शाखेकडून अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे Additional Police Commissioner Crime Shailesh Balkawade, गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे DCP Crime Amol Zende, सपोआ सतीश गोवेकर ACP Satish Govekar, सुनील तांबे ACP Sunil Tambe यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात ८ ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली. Drug Paddler Pune |
कोंढव्यासह उंड्री पिसोळी, फुरसुंगी, येवलेवाडी, मांजरी, वानवडीत काल गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली. यावेळी एमडी MD (मेफेड्रोन) (Mephedrone) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ५ नायजेरियन Nigerian आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या ऑपेरेशन मध्ये ११४ ग्रॅम एमडी किंमत २२ लाख रुपये जप्त करण्यात आला. आरोपी १) आयडोफो फेबिन येनेडयु, रा. रॉयल मेडिकल बाजुची गल्ली, जगदंबा भवन रोड, पिसोळी, पुणे याचेकडे २४ ग्रॅम एम.डी. २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, रा. तिसरा मजला, सी.एन.जी.पेट्रोल पंपाचे जवळ, हॉटेल अपना जवळ, येवलेवाडी, कोंढवा, पुणे याचेकडे ३० ग्रॅम एम.डी. ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, रा. गल्ली नं.३, श्रीनाथ नगर, रंगीचा वाडा, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे यांचेकडे ३४ ग्रॅम एम.डी. ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु रा. बांदलवस्ती, लेन नं.१, उंड्री वडाची वाडी रोड, बांदल यांचे बंगल्याजवळ, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी यांचे घर झडती दरम्यान अनधिकृत वास्तव्यास असणारे ११ परदेशी नागरीक यांचेवर कारवाई करण्यात आली.
- ड्रग्स फ्री पुणे करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार कटिबद्ध
- अनधिकृत वास्तव्यास असणारे ११ परदेशी नागरीक यांचेवर कारवाई
तसेच दुसऱ्या कारवाईत कोथरुड पोलीस स्टेशन यांनी पेट्रोलिंग करीत असताना, गुणश्री सोसायटी जवळील रिकामे मैदान, किनारा चौक, कोथरुड, पुणे येथे इसम नामे १) ईर्शाद समशेर खान वय ३१ वर्ष धंदा. मजुरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे (२) ईक्बाल समशेर खान वय ३७ वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे यांना ताब्यात घेवुन, त्यांच्याकडुन ५७ ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत १२,०००००/- रुपये चा अंमली पदार्थ मिळून आला. त्या अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे येथे वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आज रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तलायाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ०५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ किंमत रुपये ३५,००,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.