•शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांचा आर्थिक बळी
डोंबिवली :- ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना डोंबिवली समोर आली आहे. व्हाट्सअप आणि टेलिग्राम वेबसाईटवर स्टार रेटिंग लिंक आणि ऑनलाइन ट्रेडिंग आयडी पाठवून पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडल्यानंतर फिर्यादी येणे डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आणण्यात आरोपींच्या विरोधात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
प्रतीक प्रभाकर हेगडे (32 वर्षे) यशोदा नगर आणि पश्चिम यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर टेलिग्राम वेबसाईटवर स्टार रेटिंग लिंक आणि ऑनलाईन ट्रेडिंग आयडी पाठवून पार्ट टाइम जॉब असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने प्रतीक यांना एकूण पाच लाख 54 हजार रुपये ऑनलाईन विविध लिंक द्वारे पाठवण्यास सांगितले आणि त्यावर तुम्हाला चांगला आर्थिक मोबदला मिळेल असे अमिष दाखविले. त्यानंतर प्रतीक यांनी वेगवेगळ्या बँकेमध्ये अज्ञात आरोपीच्या खात्यात पैसे टाकले कोणत्याही प्रकारे परतावांना आल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिर्यादी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आरोपीने कलम 420 प्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकचौरे हे तपास करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…