Dombivli Crime News : डोंबिवलीत खळबळजनक घटना ; गाडीतून उतरण्याच्या कारणावरून, चाकूने मानेवर वार
• Dombivli Crime News रेडीमिक्स प्लास्टर या गाडीतून उतरण्यावरून, अगदी किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला
डोंबिवली :- विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये आरोपीने अतिशय क्षुल्लक कारणावरून म्हणजेच गाडीतून उतरताना किरकोळ वादातून चाकूने वार केले आहे.
अविनाश चंद्रकांत बाणे, (30 वर्षे) (रा.दावडी, डोंबिवली पुर्व) यांचे 16 मे रोजी आरोपी विशाल आणि अक्षय याचेसोबत रेडीमिक्स प्लास्टर गाडीतुन उतरविण्यावरून भांडण झाल्याने आरोपी यांनी फिर्यादी बालजी कोपनर यांना शिवीगाळ करून, आरोपी अक्षय याने सोबत आणलेला चाकु काढुन बालाजी कोपनर यांचे मानेवर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 307,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी देवरे हे करीत आहेत.