Share Market Scam | ससाणेनगर येथे शेअर मार्केट घोटाळा, तब्बल ६ कोटींची फसवणूक
Sasanenagar share market scam busted

- महाठगास हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- वपोनि संतोष पांढरे यांच्याकडून आर्थिक फसवणुकीची गांभीर्याने दखल
पुणे, दि. ४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी
Share Market Scam busted | ससाणेनगर Sasanenagar Hadapsar येथे शेअर मार्केट क्लास चालकांकडून शेअर मार्केट गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील ४३ गुंतवणूकदारांना तब्बल ६ कोटी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या ठगास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे Police Inspector Santosh Pandhare यांनी आर्थिक फसवणुकीची गांभीर्याने दखल घेत घोटाळेबाज क्लास चालकाला जेरबंद केले आहे.
संशयित आरोपी प्रतिक कुमार चौखंडे, वय ३६, रा. स्वप्नलोक सोसायटी, पापडे वस्ती, फुरसुंगी, पुणे याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांना शेअर मार्केट शिकण्याची आवड होती. त्यासाठी ते Value trade share market व Trade Art share market हिंगणे कॅपीटल, फ्लॅट नं. १०१, ससाणेनगर, रामटेकडी रोड, हडपसर येथे गेले. तेथील क्लासचे संचालक प्रतिक कुमार चौखंडे यांनी फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास, गुंतविलेल्या पैशावर चांगला परतावा हा दर महिन्याला देईन. सदर परतावा हा १० टक्केने देण्यात येईल असेही सांगितले. फिर्यादी यांनी प्रतिक कुमार चौखंडे यांचेकडे शेअर मार्केटमध्ये २५,००,०००/- रु. (अक्षरी पंचवीस लाख रुपये) गुंतविले व त्याबाबतचा करारनामा केला. ऑगस्ट २०२४ पासून प्रतिक कुमार चौखंडे यांनी परतावा देण्याचे बंद केले. नंतर प्रतिक चौखंडे यांना त्यांचे मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. अधिक माहीती घेता फिर्यादी यांचेप्रमाणेच इतर ४३ गुंतवणूकदार यांची प्रतिक चौखंडे यांनी फसवणुक केल्याचे फिर्यादी यांचे लक्षात आले. फिर्यादी व अन्य गुंतवणूकदार असे मिळून एकुण ०५,९६,२१,०००/- रू इतक्या मोठ्या रक्कमेची आर्थिक फसवणुक केल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं. १५३७/२०२४, भा.द.वि. कलम ४०६, ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) कलम ३ गुन्हा करण्यात आला.

आरोपी याचे बाबत माहीती घेतली असता, तो फरार झाला होता. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी प्रतिक कुमार चौखंडे वय ३६ रा. स्वप्नलोक सोसायटी पापडे वस्ती फुरसुंगी पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सागर जानराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.