Dharashiv Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांची कारवाई, पंचायत समिती धाराशिव यांच्या तांत्रिक सहाय्यकावर कारवाई, 11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना अटक
•Dharashiv Crime News महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीचे अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याकरिता मागितली होती लाच
धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडून कारवाई करण्यात आली असून तक्रारदार यांच्या विहिरीची ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याकरिता लाच मागितली होती. कंत्राटी पदावर असलेल्या तांत्रिक सहाय्यक याला लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीने अटक केली आहे. अटक केलेल्या लाचखोर तांत्रिक सहाय्यकाचे नाव प्रवीण प्रवीण पार्श्वनाथ गडदे (41 वर्ष) हा पंचायत समिती धाराशिव येथे कामाला होता.11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर मंजुर असुन सदर विहरीचे काम सुरु करण्यापुर्वी जिओ टॅगींग करुन ऑनलाईन अपलोड करण्यासाठी आरोपी याने तक्रारदार यांचेकडे 03 जुलै रोजी पंच साक्षीदारा समक्ष साहेबांसाठी 10 हजार रुपये व स्वतःसाठी 1500 रुपये अशी एकुण 11 हजार 500 रुपयेची लाच रकमेची मागणी करुन आज रोजी पंच साक्षीदारा समक्ष 11 हजार 500 रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा पर्यवेक्षण सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव,सापळा पथक,पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, अविनाश आचार्य. यांनी लाचखोर आरोपीला अटक केली आहे.