मुंबई

Devendra Fadnavis : “कपडे आम्ही दिले, तरी आम्हालाच बोलतो?” — लोणीकरांच्या वक्तव्यावर राज्यभरात संताप

•”जनता मालक, आम्ही सेवक’ – फडणवीसांची लोणीकरांना समज

मुंबई | भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील भाषणात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले आहे. “तुझ्या मायचा पगार मी दिला… अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, मोबाईल — हे सगळं आमच्यामुळेच आहे,” असं म्हणत लोणीकरांनी त्यांच्या टीकाकारांवर केलेल्या टीकेने संतापाची लाट उसळली आहे.

हा प्रकार उजेडात येताच सोशल मीडियावरून लोणीकरांना चांगलंच धारेवर धरलं जात आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत भाजपच्या “सेवाभाव” आणि “सबका साथ” याच्या विरोधात असलेले वास्तव दाखवल्याचा आरोप केला आहे.

लोणीकरांचे वक्तव्य नेमकं काय?

परतूर तालुक्यातील एका गावात भाषण करताना लोणीकर म्हणाले, “ते कुचाळवाटेवर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार या बबनराव लोणीकरने केला. पेरणीचे पैसे मोदींनी दिले. लाडकी बहीण योजनेतून तुझ्या बायकोला पैसे मिळाले. तुझ्या अंगावरचे कपडे, मोबाईल, चपला — हे सगळं आमचं आहे. आणि आता तुम्ही आमच्यावरच टीका करता?”

या शब्दांमुळे सामान्य जनतेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली असल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर “राजकीय अहंकाराचा शिखर” असे म्हणत लोणीकरांना राजीनाम्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0