मुंबई

Devendra Fadnavis : नेपाळ येथे झालेल्या बस दुर्घटनेमधील अपघातातील जखमींची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Devendra Fadnavis Meet Nepal Bus Accident Injured People बॉम्बे रुग्णालयात सात जखमींवर उपचार,आणखी चार जखमींना उद्या रुग्णालयात भरती करणार

मुंबई :-‌ नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने 24 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या 16 जणांपैकी सात जण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी रुग्णांची भेट घेतली आहे. तसेच, उद्या आणखी चार रुग्णांना उपचाराकरिता बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातून निघालेली एक बस नेपाळच्या प्रमुख महामार्गावरील मर्स्यांगडी नदीत कोसळली. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 120 किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला. ही बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर ही एजन्सी नोंदणीकृत आहे.

नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावातील 24 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर दर्शनानंतर भुसावळ तालुक्यातील 80 प्रवासी हे नेपाळ दर्शन सफारीसाठी निघाले होते. काठमांडूतून या बस जात असताना एक बस नदीत कोसळून मोठा अपघात झाला होता. अपघात झालेल्या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. त्यापैकी किती बचावले याचा निश्चित आकडा कळू शकला नव्हता. मात्र चोवीस जणांचे मृतदेह नेपाळ येथील बचाव पथकाला नदीतून काढण्यात यश मिळाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0