Devendra Fadnavis on Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Pankaja Munde : 2 जुलै रोजी महाराष्ट्रात 11 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे.
मुंबई :- महाराष्ट्रातील आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC निवडणूक 2024) भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंवर Pankaja Munde विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय भाजपने माजी आमदार योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या उमेदवार म्हणून घोषित केल्याचा केंद्र सरकारला आनंद आहे. पंकजाताईंना विधानपरिषदेत स्थान मिळावे, यासाठी आम्ही सर्वांनी आग्रह धरला. हे भाजपच्या केंद्रीय समितीने मान्य केले आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने 11 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीसाठी पाठवली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. आगामी राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेऊन 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. Devendra Fadnavis on Pankaja Munde