Devendra Fadnavis Fake PA News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करून 15 लाखांची फसवणूक, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचे दाखवून दोघांनी 15 लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढलेला दिसत आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते खाजगी सचिवाच्या नावाने ईमेल आयडी आणि बदल्या सोबत संदर्भात शिफारस असे विविध प्रकार यापूर्वी घडले होते. आता तर मुख्यमंत्रीचा पिया असल्याचे भासून 15 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीए असल्याचे दाखवून फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींवर 15 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सामाजिक काम करण्याच्या नावाखाली या आरोपींनी फसवणूक केली. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी आरोपींची नावे आहेत. मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 170, 419, 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी आरोपी सुहास महाडिक याच्याविरुद्ध मुंबईच्या आग्रीपाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.