मुंबई

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल, श्रीकांत शिंदे यांना लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरून भाजपाच्या एका गटाकडून विरोध

मुंबई :- कल्याण लोकसभा मतदार संघात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंना निवडून आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या घोषणेमुळे या महत्त्वाच्या मतदार संघात कुणाला उमेदवारी मिळणार? याचा सस्पेन्स संपला आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांची महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्याशी थेट लढत होईल. Kalyan Lok Sabha Election Member Shrikant Shinde

दरम्यान काल रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर स्थानिक पदाधिकारी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Kalyan Lok Sabha Election Member Shrikant Shinde

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नागपूर इथे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना आम्ही सर्वजण आमची बृहद युती निवडून आणेल. Kalyan Lok Sabha Election Member Shrikant Shinde

भाजपकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणधील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागील पेक्षा अधिक मतांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा ही युती श्रीकांत शिंदेंना निवडून आणेल, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील याची आता घोषणा झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे. Kalyan Lok Sabha Election Member Shrikant Shinde

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0