Delhi Vidhan Sabha Election : दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत 19.95 टक्के मतदान, जाणून घ्या – आतापर्यंत कुठे आणि किती मतदान झालं?
![Arvind Kejriwal News](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/03/Arvind-Kejriwal-780x470.webp)
Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 2025 साठी मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच लोक मतदान करत आहेत.
ANI :- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्ली विधानसभेचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी मतदान केले.यानंतर ते म्हणाले, “मी दिल्लीतील सर्व जनतेला मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करू इच्छितो. Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News सर्व जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी मतदान करावे. अर्थात लोक त्यांनाच मतदान करतील जे काम करतील.”
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्ली विधानसभेचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “दिल्लीची जनता खूप हुशार आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते गुंडगिरी खपवून घेणार नाहीत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दिल्लीची जनता योग्य निवड करतील.”
दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 19.95 टक्के मतदान झाले.
- मध्य दिल्ली: 16.46
- पूर्व दिल्ली: 20.03
- नवी दिल्ली : 16.08
- उत्तर दिल्ली: 18.63
- ईशान्य दिल्ली: 24.87
- उत्तर पश्चिम दिल्ली: 19.75
- शाहदरा : 23.3
- दक्षिण दिल्ली: 19.75
- दक्षिण पूर्व दिल्ली: 19.66
- दक्षिण पश्चिम दिल्ली: 21.9
- पश्चिम दिल्ली: 17.67