Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्या बुधवार 5 फेब्रुवारी रोजी मतदान

Delhi Elections 2025: सत्ताधारी आप, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांचा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे
नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेच्या Delhi Elections 2025 70 जागांसाठी निवडणुका जाहीर केले आहे. या निवडणुकीकरिता उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी 2025 मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आप बाजी मारणार का? काँग्रेस भाजप यांच्यामुळे आमच्या सरकार सत्तेपासून दूर राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मतदानाच्या नंतर 8 फेब्रुवारीला याचा निकाल जाहीर होणार आहे.
आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेस यावेळी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करून आम आदमी पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकी आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. एक हाती सत्ता प्राप्त करून अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते. तर भाजपाला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचा एकही उमेदवार 2020 च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही.
मागील काही दिवसांपासून प्रचारादरम्यान आप आणि इतर पक्षांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. भाजपाकडून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली होती.तर दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.