देश-विदेश

Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर कारवाई, विभव कुमारविरोधात एफआयआर दाखल

Swati Maliwal Fire Against Vibhav Kumar : स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी विभव कुमारविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

ANI :- आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (AAP MP Swati Maliwal) यांच्या तक्रारीनंतर विभव कुमार (FIR Against Vaibhav Kumar) यांच्याविरुद्ध गैरवर्तन प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी काल त्यांचा जबाब नोंदवला. आता विभव कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभव कुमार विरुद्ध आयपीसी कलम 354,507,509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (गुरुवारी) दिल्ली पोलीस स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले आणि सुमारे चार तासांनंतर त्यांच्या घरातून परतले. यादरम्यान स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांसमोर आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीबाबत जबाब नोंदवला. आपल्या निवेदनात त्यांनी 13 मे रोजी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. मात्र, त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव नाही. Swati Maliwal Case Latest Update

प्रथम, राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमार यांना समन्स बजावले, त्यानुसार कुमार यांना आज 17 मे रोजी सकाळी 11 वाजता हजर राहावे लागेल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्यावर आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी गैरवर्तनाचा आरोप केला होता. मात्र, याप्रकरणी आम आदमी पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. Swati Maliwal Case Latest Update

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून पक्ष अशा लोकांसोबत अजिबात नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी म्हटले होते. राज्यसभा खासदाराने ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले होते. याशिवाय आम्ही या प्रकरणी स्वाती मालीवाल यांच्यासोबत आहोत, असेही ते म्हणाले होते. Swati Maliwal Fire Against Vibhav Kumar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0