क्राईम न्यूज
Trending

Deepak Mankar | दीपक मानकर यांच्याकडून शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा !

  • फौजदारी गुन्हा दाखल होताच घेतला निर्णय

पुणे, दि. १४ मे, महाराष्ट्र मिरर :

Deepak Mankar | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांकडून बनावट कागदपत्र प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने मानकर यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस कडून सदर राजीनामा मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. Deepak Mankar

परदेशी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी शंतनू कुकडे याचे रौनक जैन याच्या खात्यातून दीपक मानकर यांच्या बँक खात्यात सुमारे पावणे दोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. याबाबत अधिक तपास परिमंडळ १ उपायुक्त संदीपसिंह गिल करत असताना याबाबत माहिती समोर आली होती. Pune Crime News

पोलीस तपासात आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी मानकर, कुकडे, जैन यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले होते. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0