शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
मुंबई :- शालेय मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांनी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांचे पुत्र शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान यांच्या भेटीची बातमी जर खोटी असेल तर त्याचे खंडन ठाकरे का करत नाही असं सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
नेमके काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर?
मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी चर्चा आणि बातम्यांचे खंडन केलेले नाही, त्यामुळे आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्न तो योग्य आहे की, तुमची गॅरटी आहे का आणि तुम्ही इतरांना आघाडीत येण्यास सांगत आहे. आंबेडकर तत्त्वासाठी लढणारे नेते, ते त्याच्यासाठीतच महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याचे उत्तर द्यावे, असे केसरकरांनी म्हटले आहे. आता तरी शिवसैनिकांनी डोळे उघडावे, असे केसरकरांनी म्हटले आहे.दीपक केसरकर म्हणाले की, आमच्यावर खोटे आरोप करत होते त्यांना मनापासून भाजपसोबत जायचे होते. काँग्रेसच्या मागून त्यांची फरफट सुरू आहे. आम्ही त्यांच्यासोबत नाही, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायला हवा. आमच्यावर घाणेरड्या शब्दात बोलणारी लोक गुपचूप भेटायला जातात तेव्हा त्यांची खरे रूप व जनतेसमोर येत असतात. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो म्हणून त्यांनी बोललेले सहन केले. आता ते खोटे बोलले हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले असेल महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला युती म्हणून निवडून दिले होते. पण यांनी निवडून आल्यावर वेगळी भूमिका घेतली.