पुणे
Trending

Daund Police News : वेताळ बाबा मंदिरामागे ‘दम मारो दम’ ! जो पोलिसांना दिसत नाही का ?

[ नाथाचीवाडी शिवारात अवैध धंद्याची चलती !
शिवारातील अड्डा कोणाच्या बिटचा ? ]

[ दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी ]
Daund Police News : दौंड, ता. १८ नाथाचीवाडी शिवारातील सर्वाधिक चलती असलेला धंदा म्हणजे ताडी, जुगार आणि दारु ! त्यापैकी जुगाराच्या धंद्याला फार मोठी इन्वेस्टमेंट लागत नाही किंवा मालकी हक्काच्या जागेची गरज नसते. जिथे कुठे जागा मिळेल तिथे दिवसा ढवळ्या किंवा राञीच्या अंधारात मोबाईलच्या उजेडात खुलेआम जुगार खेळले जातात. स्थानिक गुन्हा शाखेत Daund Crime Branch कोणाचे आहे हे बिट हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा मांडण्याची संधी मिळाली आहे. Daund Crime News


जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र मिरर चे कार्य सातत्याने सुरू आहे. माञ निबरगट्ट झालेले अवैध व्यवसायिक व त्यांच्याकडून मलिदा खाणारे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तरुण पिढी बरबाद झाली तरी चालेल मात्र यांच्या तुंबड्या भरल्याच पाहिजे असा अलिखित फतवा यांनी काढून ठेवल्याचे दिसत आहे.


नाथाचीवाडी शिवारात Nathchi Wadi Daund News जुगार अड्डे, ताडी, अवैध दारू जे व्यवसाय करतात त्यांच्या मागे नक्कीच कोणाचे तरी पाठबळ असते. त्यांच्या शिवाय हे व्यवसाय चालणे अवघड आहे. आजच प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेताळ बाबा मंदिरामागे सुरू असलेला जुगार अड्डा, ताडी आणि दारुचा अड्डा कोणाच्या बिटमध्ये येतो हा प्रश्न समोर आला आहे. या जुगार, ताडी, आणि दारुच्या या खड्ड्यामध्ये जाताना आपला मोबाईल हातात घेता येत नाही. हा भाग म्हणजे त्या जुगार अड्ड्याच्या सुरक्षेसंबंधी जोडलेला आहे. पण ज्याचे बिट आहे त्यालाही बाब माहित नाही असे घडते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. असो सर्वांना आपले अधिकार भारतीय संविधानाने दिलेले आहेत. जुगार अड्ड्यामुळे अनेक कुटूंबाचा उदर्हनिर्वाह चालतो त्यामुळे त्यावर जास्त लिहिणे अयोग्यच आहे. Daund Crime News

अनेक जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून आपली उत्तम कारकीर्द घडविणारे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब यवत पोलीस स्टेशन (Yawat Police Station) हद्दीतील तरुणाई आकर्षित होणाऱ्या अवैध धंद्यांकडे गांभीर्याने पाहणार आहेत का ..? असा प्रश्न स्थानिक जनतेला पडत आहे.

वेताळ बाबा मंदिरामागे झाडाझुडुपांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गावठी दारू, ताडी, आणि जुगार खेळण्यासाठी अनेक मद्यपी गटागटाने येथे बसलेले असतात. मद्यपींवर कारवाई करावी
— एक ञस्त नागरिक

यवत ते नाथाचीवाडी रोडवरील ओढ्यात गावठी दारू (Alcohol Plastic Bag), ताडी पिऊन प्लास्टिकच्या पिशव्या टाकून दिल्या जातात. येथे प्लास्टिक पिशव्यांचा खच पडून असल्याचे दिसले. दुसऱ्या छायाचित्रात झाडाझुडपात बसलेले मद्यपी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0