[ ठेकेदार पळून गेला म्हणजे आम्हीही गाव सोडून पळून जायचे का ? तीनही गावातील नागरिकांचा प्रशासनाला सवाल ]
दौंड,ता. ४ दौंड तालुक्यातील गार, नानविज, सोनवडी या गावाला पाणीपुरवठा करणारी १३ कोटींची योजना मंजूर होईल सहा वर्षे झाली आहेत. पण, अजूनही ही योजना पूर्ण न झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि भविष्यात सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. थांबलेल्या कामाची गती येत्या १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवा अन्यथा १६ सप्टेंबर रोजी रयत क्रांती संघटना व तीनही ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकारी, गावातील महिला व ग्रामस्थ यांच्याकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्रमांक १ ला टाळे ( कुलूप ) ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला असून कार्यकरी अभियंता अर्जून नाडगौडा यांना निवेदन देण्यात आले. Daund Breaking News
नागरिकांच्या समस्यांच्या लढ्यासाठी वेळोवेळी रयत क्रांती संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष सर्फराज शेख यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही. नागरिकांनी याबाबत दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यांच्याकडे सुद्धा या योजनेविषयी गाऱ्हाणे मांडले होते. यावर त्यांनी सुद्धा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्यांच्याही पाठपुराव्याला यश आले नाही. Daund Breaking News
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या कंञाटदाराच्या चुकीमुळे ही योजना धुळखात पडली आहे. याकडे लक्ष देऊन ही योजना तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटना व तीनही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प असल्यामुळे पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी अपुरे मनुष्यबळ, अनुभव नसलेले अभियंता व नियोजनाचा अभाव दिसून येतो. सहा वर्षे रखडलेल्या कामासाठी तातडीने निवेदनात नमूद करण्यात आलेल्या प्रश्नांवर सखोल चौकशी करून कंञाटदाराला काळ्या यादीत टाकून दंड आकारण्यात यावा. १५ सप्टेंबर पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास १६ सप्टेंबरला प्राधिकरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला असल्याची माहिती शेख यांनी दिली. Daund Breaking News
ठेकेदार पळून गेला, म्हणजे आम्हीही गाव सोडून पळून जायचे का ? तीनही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना जारच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. मात्र, गेल्या ६ वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम चालूच आहे. त्यामुळे गार, नानविज, सोनवडी या गावातील नागरिकांना दरवर्षी पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. जनावरे पाणी पिणार नाहीत, असे पाणी नागरिकांना प्यावे लागते हे दुर्दैव आहे. तीनही गावांनी १४ वर्षाचा वनवास भोगूनही पुन्हा प्रतिक्षा लागत आहे. स्वातंञ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना असे प्रश्न कायम असतील तर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात काय मिळाले, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
— सर्फराज शेख, रयत क्रांती संघटना तालुका अध्यक्ष दौंड