Cyber Crime News : सायबर पोलीस ठाणेस यश
Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम 69 हजार 60 रुपये तक्रारदार यांचे परत
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीतील निकेत अग्रवाल यांची क्रेडीट कार्डद्वारे 69 हजार 60 रूपरया ची फसवणूक झालेबाबत सायबर पोलीस ठाणे आयक अर्ज 24 फेब्रुवारी 2024 अन्वये प्राप्त आहे. Cyber Crime News
तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली, फसवणूक रक्कम Easebuzz Private Limited (Intermediators) through CheQ Digital Private Limted च्या मर्चन्टच्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सदरची फसवणूक रक्कम 69 हजार 90 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मूळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Cyber Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे Avinash Ambure, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार प्रविण आव्हाड, गणेश इलग,ओमकार डोंगरे,विलास खाटीक, राहूल बन, सावन शेवाळे, शुभम कांचळे, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे यांनी पार पाडली आहे. Cyber Crime News