CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा डीपी वापरून पैशाची मागणी ? पोलीस दलात खळबळ

- CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः डीपीवर मेसेज ठेवून फसवणूक होऊ नये साठी केले आवाहन
पुणे, दि. १९ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) CP Amitesh Kumar
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police CP Amitesh Kumar) यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी चक्क त्यांचा फोटो डीपीवर ठेवून पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याबाबत अमितेश कुमार यांनी सतर्कता दाखवत स्वतः डीपीवर मेसेज ठेवून फसवणूक होऊ नये साठी आवाहन केले आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे अमितेश कुमार यांची प्रतिमा डागाळण्यासाठी काहीजण कुरापती करत आहेत. पुणे शहरातून अवैध धंदे व गँगस्टर यांना हद्दपार केल्याने काही समाजकंटकांना पोटशूळ उठले आहे. अमितेश कुमार यांची प्रतिमा मालिन करून त्यांची बदली करण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे समजते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा डीपी वापरुंन जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती द्या.