मुंबई

Mumbai Crime News : 40 बारबालांचा नाच… आणि पोलिस निरीक्षक थेट निलंबित!

नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या बारवर छापा; एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलंबित; विभागीय चौकशीचा फड उघडला!

मुंबई | अंधेरी एमआयडीसीतील एका हायप्रोफाईल बारमध्ये तब्बल 40 बारबाला अश्लील नृत्य करताना पकडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. परंतु या पेक्षा मोठा धक्का म्हणजे, या सगळ्यावर कानाडोळा करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे!

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बारवर धाड टाकली आणि त्यात नियमांचं तीन तेरा वाजलेलं आढळून आलं – कोणताही परवाना न घेता नृत्य सुरू, मद्यपान खुलेआम, आणि पोलिस प्रशासन ‘मौन’!

या प्रकरणात हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर विभागीय चौकशीसह कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

पोलीस विभागात याआधी अशा घटना झाल्यानंतर केवळ बदलीचा फार्स रंगत असे. पण यावेळी सरळ निलंबन करून ‘संदेश’ देण्यात आला आहे — कायदा तोडणाऱ्यांना माफ नाही, आणि डोळेझाक करणाऱ्यांना तर अजिबातच नाही!

एक गोष्ट निश्चित — एमआयडीसीत नियमांची खेळच सुरू होती, पण आता पोलिस विभागात खळबळ माजली आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0