Sanjay Nirupam : काँग्रेसने संजय निरुपम यांना दिला मोठा धक्का! या यादीतून काढले
Congress Take Big Action Sanjay Nirupam : काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
मुंबई :- काँग्रेसने Congress पक्षाचे नेते संजय निरुपम Sanjay Nirupam यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. सतत पक्षविरोधी कारवायांमुळे संजय निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. संजय निरुपम यांच्यावरील कारवाईचा निर्णय दिल्ली स्तरावर घेतला जाईल.संजय निरुपम यांच्या सततच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. आता यावर काँग्रेसची शिस्तपालन समिती निर्णय घेईल. मुंबईतील दादर येथील टिळक भवनात काँग्रेसची बैठक सुरू आहे. Congress Take Big Action Sanjay Nirupam
उद्धव ठाकरेंनी एकतर्फी उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडीसमोर काँग्रेस गुडघे टेकल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. Congress Take Big Action Sanjay Nirupam
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आतापर्यंत 21 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या यादीत उत्तर पश्चिम मुंबईचाही समावेश आहे. संजय निरुपम यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या जागेवरून शिवसेनेने (यूबीटी) अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली. यावरून संजय निरुपम संतप्त झाले आणि त्यांनी आपल्याच पक्षाला अल्टिमेटम दिला. अमोल कीर्तीकर हे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीचा निषेधही केला होता. Congress Take Big Action Sanjay Nirupam