मुंबई

Congress Party : गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यासाठी रोखण्यात यावे, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू नये असे पत्र काँग्रेसचे निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे

मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागांकरिता आज मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या अकरा जागांकरिता बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची सर्व पक्षांना भीती वाटत आहे. मताचे विभाजन होऊ नये किंवा आपला आमदार फोटो नाही याकरिता सर्व पक्षांनी अतिशय काटेकोरपणे खबरदारी घेतली आहे म्हणून निवडणुकींच्या पूर्वसंध्येलाच सर्व आमदारांना आपापल्या पक्षाने वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ठेवले होते. गोळीबार प्रकरणातील अटकेत असलेले कल्याण पूर्वचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. निवडणूक आयोगाने गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे.

भाजपा आमदार गणपत गायकवाड 100 टक्के मतदान करणार- संजय कुटे

गणपत गायकवाड यांना मतदानाचा अधिकार आहे. तुरुंगात असला तरी लोकप्रतिनिधी मतदान करू शखतो. ते 100 टक्के मतदान करतील, असे भाजप आमदार संजय कुटे म्हणाले. तर मला काँग्रेसची कीव येते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांचीही मला कीव येते. गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीत, असे ते सांगत आहेत. आतापर्यंत विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत बऱ्याच आमदारांनी तुरुंगात असताना मतदान केलेलं आहे. हा इतिहास आहे

आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुखवर पोलीस ठाण्यात गोळीबार केली होती. यामध्ये शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गंभीर जखमी झाले होते या गोळीबार नंतर गणपत गायकवाड यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे गणपत गायकवाड यांनी सांगितले होते. हे सर्व प्रकरण जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान घडलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0