Congress Core Committee Met Rashmi Shukla : काँग्रेस कोर कमिटीने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची घेतली भेट
•राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्यापासून महाराष्ट्रात
मुंबई :- काँग्रेसच्या कोर कमिटीने आज (11 मार्च) रोजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी काढलेली “भारत जोडो न्याय यात्रा”उद्या महाराष्ट्रात दाखल होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागात ते मार्गस्थ होणार आहे. तसेच 17 मार्च 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) दादर येथे यात्रेची सांगता होणार असून या ठिकाणी इंडिया आघाडी मधील देशातील विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. कायदा सुव्यवस्था बाबत योग्य ती जबाबदारी पोलिसांनी पार पाडावी याकरिता काँग्रेस कोर कमिटीने रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आदी काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते. यांनी रश्मी शुक्ला यांना पत्र देऊन कशाप्रकारे यात्रा असणार आहे हे सांगितले आहे. Congress Core Committee Met Rashmi Shukla
काँग्रेसने पत्रामध्ये काय म्हणाले?
रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दिनांक 12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. या यात्रेत राज्यातील तसेच भारतातील विविध राज्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित असणार आहेत. ही यात्रा 12 मार्च ते 17 मार्च या कालावधीत नंदुरबार-धुळे- नाशिक-मोखाडा-जव्हार-विक्रमगड-वाडा-भिवंडी-ठाणे-मुंबई येथून जाणार असून दादर येथील चैत्यभूमी येथे यात्रा संपन्न होणार आहे. Congress Core Committee Met Rashmi Shukla
17 मार्च 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील सभेने यात्रेची सांगता होणार आहे. या सभेमध्ये इंडीया आघाडीमधील देशतील विविध पक्षांचे प्रमुख आणि मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. Congress Core Committee Met Rashmi Shukla
सदर यात्रेचा मार्ग व कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने वरीलप्रमाणे अंतिम केला आहे. तथापि, यामध्ये परिस्थितीनुसार अंशत: बदल होऊ शकतो. आपल्या माहितीस्तव सदर बाबी आपल्याला अवगत करत आहोत. महाराष्ट्र पोलीस कायम सजग आणि दक्ष असतात, यावेळीही भारत जोड़ो न्याय यात्रेच्या सुरक्षेच्या संदर्भात आपण आवश्यक ती काळजी घ्याल, असा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद. Congress Core Committee Met Rashmi Shukla