Coastal Road Traffic : मुंबई कोस्टल रोड फेस-2 च्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
Coastal Road Traffic Update : पोलीस उप आयुक्त मध्य वाहतूक विभाग समाधान पवार यांचे निर्देश वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल पर्यायी मार्गाचा सुजाव
मुंबई :- राज्य सरकारचा मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला कोस्टल रोड फेस टू Coastal Road Phase 2 च्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये Mumbai Traffic Update मोठा बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडची पाहणी करून पोस्टल रोड मध्ये होणारी गळती लक्षात घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी कामकाजामध्ये कोणताही दिरंगाई न करता त्वरित योग्य ते कामकाज करून कोस्टल रोड पूर्व पदावर करावा अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली होती आता कोस्टल रोड फेस टू च्या कामामुळे मुंबईकरांना वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक अडचणी समस्या दूर होण्याकरिता पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी पर्यायी मार्ग सुजाव केला आहे. असे निर्देश वाहतूक विभागाने दिले आहे. खान अब्दुल गफार खान मार्गाची उत्तर वाहिनी प्रभादेवी दादर कडे जाणाऱ्या वाहनांची तात्पुरती बंदी करण्यात आली आहे. तसेच 02 जून ते 30 नोव्हेंबर जवळपास पाच महिन्याचा कालावधी करिता बदल करण्यात आले आहे. Mumbai Coastal Road Traffic Update
कोणत्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि कोणता पर्याय मार्ग दिला आहे
रस्ता वाहतूकीसाठी बंद
खान अब्दुल गफारखान मार्गावरील बिंदू माधव जंक्शन पासून उत्तर वाहिनीने जे. के. कपुर जंक्शन, प्रभादेवी कडे जाणारी वाहतूक सी लिंक गेट येथे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. सदर मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना केवळ सी लिंकवर प्रवेश देण्यात येईल.
पर्यायी मार्ग
1) मेला जंक्शन/खान अब्दुल गफार खान फ्लायओव्हर वरळी नाका पोदार जंक्शन पुढे इच्छीत स्थळी
2) बिंदु माधव जंक्शन-उजवे वळण फ्लोरा जंक्शन-सरपोचखानवाला मार्ग-जे.के. कपुर जंक्शन पुढे इच्छीत स्थळी.
3) बिंदु माधव जंक्शन-उजवे वळण फ्लोरा जंक्शन पोदार जंक्शन पुढे इच्छीत स्थळी. अशाप्रकारे पुढील पाच महिने मुंबईतील कोस्टर रोडच्या कामकाजामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल राहणार आहे.
Web Title : Coastal Road Traffic: Change in traffic system due to work of Mumbai Coastal Road Phase-2