CM Eknath Shinde : ठाकरे गटाच्या माजी दोन नगरसेवक शिंदे गटात
Two Uddhav Thackeray Corporator Join CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि माजी नगरसेवक यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश, असंख्य कार्यकर्त्यांबरोबर पक्षामध्ये प्रवेश
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच Vidhan Sabha Election अनेक पक्षतील कार्यकर्ते, पदाधिकारी महत्त्वाचे नेते या गटातून त्या गटात जाण्याकरिता उत्सुक आहेत. ठाकरे गटाला Thackeray Group शिंदे गटांनी पुन्हा एकदा धक्का देत ठाकरे गटाचे माजी दोन नगरसेवक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील झाले आहे.मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंघण यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांचे पती माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे आणि गीता सिंघण यांचे पती विधानसभा समन्वयक संजय सिंघण यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की
मुंबई शहर सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनावे यासाठी आपण अनेक निर्णय घेतल्याचे यावेळी बोलताना नमूद केले. शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. शहरात मोकळी मैदाने असायला हवीत यासाठी मुंबई रेसकोर्सची 112 एकर जागा आणि मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची मोकळी जागा अशी मिळून 300 एकर जागेवर आपण सेंट्रल पार्क तयार करत असल्याचे यासमयी सांगितले. हे प्रकल्प आधी देखील करायचे ठरले होते मात्र काही कारणामुळे ते झाले नाहीत मात्र आपण ते केले. त्यामुळे आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर शिवसेनेला पर्याय नसल्याचे याप्रसंगी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना यांसारख्या योजनांचे फॉर्म ताबडतोब भरून घ्या आणि आपल्या विभागातील जास्तीत जास्त लोकांना या योजनांचे लाभ कसे मिळू शकतील ते पहा असे आवाहन यावेळी केले.
यासमयी आमदार प्रकाश सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.