महाराष्ट्र
Trending

Sambhaji Raje : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छत्रपती संभाजी राजांची माघार

Loksabha 2024 :  महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर..!!

कोल्हापूर :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election 2024 सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असतानाच, यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे होणारा असुन निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संभाजी राजे Sambhaji Raje छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजे छत्रपती Sambhaji Raje यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. छत्रपती संभाजी राजे Sambhaji Raje यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारात 100 टक्के उतरणार असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलंय. माझ्यासाठी माझे वडिलच सर्वस्व आहेत, वडिलांसाठी आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

छत्रपती शाहू महाराज Sambhaji Raje आणि आमचे वडील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमचा प्रश्नच येत नाही, असं संभाजी राजेंनी म्हटलंय. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात 110 टक्के काम करणार, जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहे, निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही असं संभाजी राजे यांनी स्पष्ट केलं आहे.

मला महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल काही बोलायचे नाही. शरद पवार यांच्या विषयी देखील काही बोलायचे नाही. माझ्यासाठी केवळ शाहू महाराज छत्रपती एकमेव लाईन आहे. या व्यतिरिक्त मला काही बोलायचे नाही, असे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. कमी वेळामध्ये सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर देखील संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. मी, मालोजीराजे यांच्यासह आमच्या घरातील कुटुंबातील सर्व मुले देखील आता तयार आहेत त्यामुळे आम्ही सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचणार असल्याचा दावा, संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करणे हे एकमेव आमच्या कुटुंबीयांचे ध्येय आहे. कोल्हापूरचे नाव कसे मोठे होईल, त्यात जिल्ह्याचा विकास कसा होईल, देशात नाही तर जगाच्या पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे नाव पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले. हे एकमेव आमचे ध्येय असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0