Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक छत्रपती संभाजीनगर विभागाची कारवाई ; तलाठीसह शेतकऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक
•Chhatrapati Sambhaji Nagar Crime News तलाठी यांने सातबारा वरील नावे नोंदवण्याकरिता मागितली होती दहा हजाराची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तलाठी गजाआड
छत्रपती संभाजीनगर :- वडील व चुलत भाऊ यांची सातबारावर वारसा हक्काने नावाची नोंद करण्याकरिता तलाठी यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजाराची मागणी केली होती. तलाठी ने केलेल्या पैशाच्या मागणीच्या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांना तक्रार केली होती. छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तलाठ्याला आणि त्यांच्या सहकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
तलाठी एसीबीच्याr जाळ्यात
प्रवीण अशोक दिलवाले (47 वर्ष) तलाठी, काटे पिंपळगाव तालुका गंगापूर, बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण (38 वर्ष) (खाजगी व्यक्ती) शेतकरी या दोघांनी मिळून तक्रारदार याच्याकडे वडील व चुलत भाऊ यांचे सातबारा वर वारसा हक्काने नाव नोंदवण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना पंचसमक्ष तलाठी याने खाजगी व्यक्ती असलेल्या चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले. चव्हाण यांनी स्वीकारलेली रक्कम ही तलाठी यांच्या सांगण्यावरून घेतली असल्याचे सांगितले छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधकाच्या युनिटने दोघांनाही अटक केली असून पुढील कारवाई करिता गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत पथक, छत्रपती संभाजीनगर युनिट
पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक राजू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमूल धस, पोलीस आमदार युवराज हिवाळे, केवलसिंग घुसिंगे, बागुल या युनिटने लाचखोर तलाठ्याला तसेच एका व्यक्तीला अटक केली आहे.