Chandrashekar Bawankule : महसूल खात्याच्या 12 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नतीचा मान

•केंद्र सरकारची अधिसूचना, बावनकुळे म्हणाले – “प्रशासनाचा नवा अध्याय सुरू”
मुंबई : महाराष्ट्राच्या महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे राज्य प्रशासकीय सेवेत नवा इतिहास रचला गेला आहे.
या अधिकाऱ्यांना IAS कॅडर मिळाल्याने त्यांना अधिक व्यापक जबाबदाऱ्या आणि अधिकार मिळणार आहेत. महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांचे केंद्र सरकारकडून असे गौरवपूर्वक मूल्यांकन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत ट्विट करत सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “हे केवळ वैयक्तिक यश नसून, महाराष्ट्राच्या लोकाभिमुख प्रशासनाची पावती आहे,” असे सांगत त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले.
“मी महसूलमंत्री म्हणून या अधिकाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यांच्या कार्यक्षमतेवर मला नेहमीच विश्वास आहे. लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही पदोन्नती त्यांना नवी संधी देईल,” असे बावनकुळे यांनी म्हटले.
या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनालाही देण्यात आले आहे. “फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिकारी प्रोत्साहित होत आहेत आणि आजची पदोन्नती हीच त्या शाबासकीची शिक्कामोर्तब आहे,” असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदोन्नती
विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी
गजानन पाटील
महेश पाटील
पंकज देवरे
मंजिरी मनोलकर
आशा पठाण
राजलक्ष्मी शहा
सोनाली मुळे
गजेंद्र बावणे
प्रतिभा इंगळे
अशी आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे


