तब्बल 500 सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपीला बेड्या : वानवडी तपास पथकाची कामगिरी
Pune Crime News Wanwadi Police Take Action Against Criminal : सराईत वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी केले अटक
पुणे :- वाहन चोरीच्या Bike Thief घटना सातत्याने होत असताना वानवडी पोलिसांनी Wanwadi Police मोठे कामगिरी करत मोठ्या शिताफीने वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तब्बल पाचशे सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे.13 मार्च रोजी रात्रौ च्या दरम्यान ग्रीन व्हॅलीजवळ गोपाळ मेडीकल समोर, वानवडी येथे फिर्यादी यांनी त्यांची टिव्हीएस कंपनीची ग्रे रंगाची अपाचे आरटीआर ही लॉक करुन पार्क केलेली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे समंतीशिवाय चोरुन नेली होती. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन Wanwadi Police Station येथे , भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Pune Crime News
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यानी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान सीसीटिव्ही मध्ये दिसणारा संशयीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कासीम सलीम इराणी, रा. पठारे वस्ती, इराणी कॉलनी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे हा असल्याचे माहिती पोलीस अंमलदार विष्णू सुतार, यतिन भोसले, गोपाल मदने यांना मिळाल्याने तात्काळ सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पतंगे साो यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणाऱ्या कासीम सलीम इराणी यास ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली. Pune Crime News
अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे
1) कासीम सलीम इराणी, (25 वर्षे), पुणे
वर नमूद अटक आरोपी याचेकडे अधिक तपास करता त्याने त्याचे साथीदार मोहम्मद सय्यद इराणी, (30 वर्ष) , याचे मदतीने सदर वाहनचोरी केली असल्याचे तसेच वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आणखीन एक ठिकाणी वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून 1) वानवडी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम 379 2) वानवडी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम 379 हे गुन्हे उघड करण्यात आलेले असून सदर गुन्हयातील चोरीच्या 1 लाख 10 हजार 250 च्या टिव्हिएस अपाची व सुझुकी ॲक्सेस असे दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. Pune Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar , पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-05, पुणे शहर आर राजा, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार सर्फराज देशमुख, वानवडी पोस्टे पुणे. हे करत आहेत. Pune Crime News