Uncategorized
Trending

 BMC Iqbal Singh Chahal Removed :  लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, BMC आयुक्त इक्बाल चहल यांची हकालपट्टी

SC Removed  BMC Chief Iqbal Singh Chahal : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना हटवले आहे.

Iqbal Singh Chahal News : लोकसभा निवडणुकीपूर्वी Lok Sabha Election निवडणूक आयोगाने (EC) मोठी कारवाई केली आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना हटवण्यात आले आहे. इक्बाल सिंग चहल हे महाराष्ट्र केडरचे 1989 च्या बॅचचे प्रतिष्ठित IAS अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  18 मार्च रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात निवडणुकीशी संबंधित कामाशी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये आहेत त्यांची बदली करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला देण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक (Election Commission of India) आयोगाला महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या BMC Iqbal Singh Chahal  बदलीबाबत पत्र दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0