BJP News : भाजपा चित्रपट आघाडी संलग्न “सिने इंडस्ट्रीज वर्कर्स युनियन”चे उद्घाटन”
•भाजपाकडून मेळावा, सिने वर्कर्स चे वेगळे व्यासपीठ, भाजपाच्या माध्यमातून सरकारला उपस्थित करणार प्रश्न
मुंबई :- मुंबईत ही मायानगरी असली जरी सिनेनगरी म्हणून तिची ओळख आहे. इथे मोठ्या प्रमाणावर कलाक्षेत्र असून भारतातील बॉलीवूड मुंबईत आहे. सर्व सिने कलाकार मुंबईतच राहतात.या सिने कलाकारांसोबत काम करणाऱ्या सिने वर्करचे मुद्दे अनेक वेळी शासन दरबारीपर्यंत पोहोचतच नाही. अशावेळी भाजपकडून स्वातंत्र्य विभाग तयार करण्यात आले असून, आता सिने वर्कर चे प्रश्न शासन दरबारी भाजप मांडणार असा विश्वास भाजपा सिने इंडस्ट्री वर्कसचे अध्यक्ष विजय हरगुडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.अंधेरी येथील कंट्री क्लबमध्ये भाजपा कामगार मोर्चा अंतर्गत भाजपा चित्रपट आघाडी संलग्न ” सिने इंडस्ट्रीज वर्कर्स युनियन”चा भव्य उद्घाटन सोहळा अजित चव्हाण भाजपा प्रवक्ते आणि बुद्धिजीवी प्रकोष्ट अध्यक्ष यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे आणि सिने इंडस्ट्रीज वर्कर्स युनियनचे अध्यक्ष विजय हरगुडे, भाजपाचे नेते आणि सिने इंडस्ट्री वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष राहुलजी वाळुंज, सिने इंडस्ट्री वर्कर्स युनियनचे सरचिटणीस समीर दीक्षित, भाजपा चित्रपट आघाडीचे राकेश भोसले, हेनल मेहता, गीतांजली ठाकरे, संचित यादव, राकेश ठाकूर, जुबी मॅथ्यू, शिरीष राणे, चंद्रकांत विसपुते, शिवा मुदगिरी, अशोकजी झगडे, कैलास पवार, आंद्रे मॉरिस, जावेद शेख, रंजन प्रधान, अजय पंदिरकर, सागर खाडे, मनोज सोलंकी, सुनिता नागपुरे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले चित्रपट आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते,
शिरीष राणेंनी मार्गदर्शन करताना निवेदन केले, राहुल नवीन युनियनच्या पुढील वाटचालीचाली करिता सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी आदर्श युनियन म्हणून नावलौकिकास आणणार असे सांगितले. अजित चव्हाण यांनी सरकार आणि संघटनेतर्फे संपूर्ण पाठिंबा मिळेल याची ग्वाही दिली.
युनियनचे अध्यक्ष विजय हरगुडे म्हणाले की,फार कमी वेळात या युनियनची स्थापना झाली आहे आणि आता काम करायची वेळ आहे, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना एक लाख मेंबर बनवण्याकरता कामाला लागण्याचे आवाहन केले. समीर दीक्षित म्हणाले की सिने इंडस्ट्री वर्कर्स युनियन फक्त कामगार नाही तर चित्रपट, कला, नाटक, लोककला इत्यादी मनोरंजनच्या सर्व क्षेत्रातल्या सर्व लढ्याकरता नेहमी पाठीशी असणार आहे.सिने इंडस्ट्रीज वर्कर्स युनियन लवकरच आपल्या मेंबरशिप अभियानची सुरुवात करणार आहे, भाजपाशी संलग्न असल्यामुळे सरकारतर्फे पण युनियनच्या न्याय मागण्याकरता चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पण युनियनच्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.