युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी…; आमदार आशिष शेलार यांचे ट्विट
BJP Mumbai Leader Ashish Shelar Tweet On Aditya Thackeray : भाजप नेते आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका
मुंबई :- पण येथे आशिष शेलार Ashish Shelar यांनी काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT Group आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना कवितेच्या माध्यमातून दररोज टीका सत्र चालू केले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट Ashish Shelar Tweet करत आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्यावर निषणाचा आहे.युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी अशा शब्दात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आमदार आशिष शेलार यांचे ट्विट
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ,
मातोश्रीच्या युवराजांची केवढी वळवळ,
थोडी थोडी न थोडकी लागली फार,
याकूबच्या कबरीला साज आणि
हिंदू द्वेषाचा विखार…!…अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ ..!..शाखा शाखा गरागरा फिर फिर फिरे…गद्दार.. गद्दार.. बालिश ढोल…बडवे…युवराजांची स्वारी बाई तोऱ्यामध्ये खडी…पेग, पेग्विन पार्टीची चुकतेय छम छम घडी…बुडणाऱ्या बेडकांची या बडबड फार….इवल्याशा गटाचा हा भरुन तलाव…साबु-बिबु नको.. ..थोडा मुंबईच्या मातीचा टिळा कपाळी लगाव!…अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ !…(कवी संदीप खरे यांची क्षमा मागून)