Lok Sabha Election 2024 : शासकीय विभागाच्या वेबसाईटवरून राजकीय नेत्यांचे फोटो हटवण्यास सांगितले
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केले असून आचारसंहितेच्या काळात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय नेत्यांना प्रशासकीय विभागाच्या वेबसाईटवरून आपले फोटो काढण्यास सांगितले आहे.
निवडणूक आयोगाकडून Lok Sabha Election 2024 कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यानंतर तत्काळ आचारसंहिताही लागू होईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना वारंवार जारी केल्या जात आहेत. या अगोदर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उमेदवारांसाठी प्रचारादरम्यान कोणती दक्षता बाळगावी याबाबत सूचना केल्या होत्या.
निवडणुकीत Lok Sabha Election 2024 प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी मतं मागू नयेत. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी विधाने करून नयेत, धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी उपयोग करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. शिवाय , आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे.