मुंबई

Bhiwandi Drugs News : भिवंडीत अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई! माणकोली उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या उल्हासनगरच्या 2 तरुणांना अटक; 84 लाखांचा गांजा जप्त

•दुचाकीच्या डिकीत तब्बल 10 किलो वजनाचा गांजा आढळला; दोघांविरोधात ‘एनडीपीएस’ कायद्यान्वये गुन्हा

भिवंडी :- ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असतानाच, भिवंडी येथील नारपोली पोलिसांनी बुधवारी रात्री मोठी कारवाई करत उल्हासनगरच्या दोन तरुणांना सुमारे 84 लाख 47 हजार रुपये किमतीच्या गांजासह रंगेहाथ पकडले आहे.

बुधवारी रात्री नारपोली पोलीस माणकोली उड्डाण पुलाच्या भिवंडी हद्दीत गस्त घालत होते. यावेळी साई सहारा हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू होती. पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून अवजड वाहनांचा आडोसा घेऊन सुसाट वेगाने पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे आढळले.

दुचाकीच्या डिकीत 10 किलो गांजा

संशय आल्याने पोलिसांनी या तरुणांचा पाठलाग करून त्यांना रोखले. घाई असल्याचे सांगत तरुणांनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीतील साधन पेटीची (डिकी) तपासणी केली असता, त्यामध्ये गांजाची हिरवी सुकलेली बोंडे आणि पाने आढळली.

जप्त केलेला गांजा 516 ग्रॅम वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंदिस्त केलेला होता, ज्याचे एकूण वजन 10 हजार ग्रॅम (10 किलो) भरले. हा संकरित गांजा असून बाजारात त्याची किंमत 84 लाख 47 हजार इतकी आहे.

पोलिसांनी आकाश रमेश गुप्ता (24 वय, रा. उल्हासनगर) आणि हर्ष रवी ब्राह्मणे (26 वय, रा. उल्हासनगर) या दोन्ही गांजा तस्करांना ताब्यात घेतले आहे. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरोधात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे गांजा तस्कर आता गांजाची ने-आण करण्यासाठी रात्रीच्या वेळी दुचाकींचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गेल्याच आठवड्यात कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने गांजाची तस्करी करणाऱ्या 17 जणांच्या आंतरराज्य टोळीवर ‘मोक्का’ (MCOCA) लावण्यात आला होता. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नारपोली पोलिसांनी केलेली ही कामगिरी लक्षणीय मानली जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago