Bhiwandi Crime News : शांतीनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीस दोन तासात बेड्या
Bhiwandi Crime News : शांतीनगर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट झालेल्या अल्पवयीन मुलीवर जबरी अनैसर्गिक संभोग करून तिचा खून केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस माहिती मिळाल्यानंतर दोन तासात ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी पोलीस स्टेशन कडे सुपूर्द केलेबाबत
मुंबई :- शांतीनगर पोलीस ठाणे Shanti Nagar Police Station हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलगी, वय 09 वर्षे, हिस आरोपी नामे अभय यादव याने फुस लावून फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन, तिचेवर अनैसर्गिक जबरी संभोग करून, तिचा गळा आवळून, तिला जीवे ठार मारले. याबाबत रिपोर्ट झालेल्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच मा. DCP सो. Crime, मा. ACP सो. D -1 यांना माहिती देऊन त्यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचना, मार्गदर्शन प्रमाणे व प्राप्त माहितीच्या आधारे तात्काळ भिवंडी क्राईम युनिट 2 Bhiwandi Crime Unit 2 कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून आरोपीचा कल्याण भिवंडी परिसरात शोध घेतला. Bhiwandi Crime News
भिवंडी परिसरातील दारूचे अड्डे, मोकळी मैदाने, बंद व पडकी घरे, लूम कारखान्यांचा परिसर अशा सर्वत्र ठिकाणी गांभीर्यपूर्वक व सखोल शोध घेतला असता गुन्हयाची माहिती प्राप्त झाल्यापासून दोन तासाचे आतमध्ये आरोपी नामे अभय यादव हा गणेश मंदिर नारायण कंपाउंड, शांतीनगर, भिवंडी या ठिकाणी एका पडक्या व बंद घरामध्ये मिळून आला असता, त्यास ताब्यात घेऊन, त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतलेल्या स्थितीमध्ये शांतीनगर पोलीस ठाणेस गुन्ह्याचे पुढील कायदेशीर कारवाईकामी ताब्यात दिले आहे. Bhiwandi Crime News
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने शांतीनगर पोलीस ठाणे येथे गु.र. क्रमांक 1357/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 64(2), (i), 64(2), (k), 64(2)(L), 65(2), 66, 137(2), सह पोक्सो कायदा कलम 6, 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. Bhiwandi Crime News
कारवाई पथक : पोनि योगेश आव्हाड सपोनि श्रीराज माळी पोहवा साबीर शेख पोहवा वामन भोईर पोहवा सचिन जाधव पोशी अमोल इंगळे चापोशी रवींद्र साळुंखे.