क्राईम न्यूज

Bhiwandi Crime News : बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले अटक

•उल्हासनगर पोलिसांची कारवाई, आरोपींना अटक

भिवंडी :- बेकायदेशीर रित्या गावठी बंदूक ( कट्टा) बाळगणाऱ्या तीन तरुणावर कारवाई करत उल्हासनगर पोलिसांनी Ullhasnager Police अटक केली आहे. उल्हासनगरच्या तीन नंबर परिसरात राहणाऱ्या दिनेश केर रावल उर्फ दिनू (26 वर्षे), इम्तियाज युसुफ लाला उर्फ पप्या (44 वर्षे), मोहम्मद असीम अब्दुल कय्युम खान (27 वर्षे) या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. Bhiwandi Crime News

17 मार्च 2024 रोजी दुपारी 4.40 वाजेच्या सुमारास अमरडाय कंपनी लगत असलेल्या रोडवर शहाड स्टेशन जवळ उल्हासनगर एक या परिसरात तीन तरुणांची अंगझडती घेतले असता पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक गावठी लोखंडी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, तिन्ही आरोपींचे फोन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे यांनी दिलेला माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक तारमळे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हवालदार गुरसाळी पोलीस हवालदार शिंपी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.पोलिसांनी दिलेला तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास‌ पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहे. Bhiwandi Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0