मुंबई

Bhiwandi Crime News : नवरा बायकोचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुण्याला जीवे ठार मारले

•Bhiwandi Crime News भिवंडी मधील कौटुंबिक वादातून हत्या, पती पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भावाला पतीने ठार मारले

भिवंडी :- गेल्याकाही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. किरकोळ वाद विकोपाला जाऊन प्राणघातक किंवा जीवे ठार मारण्याचे अनेक प्रकार समोर येत असताना भिवंडीत अशीच एक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पतीच्या भावाला आणि वडिलांना मारहाण करून पत्नीच्या भावाला जीवे ठार मारल्याची घटना समोर आली आहे. तात्काळ पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे ही घटना भिवंडीच्या शांती नगर परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भांडण सोडवण्यासाठी आलेला,हाच राग मनात धरून पत्नीच्या भावाला जीवे ठार मारले

जावेद अलीम खान (29 वर्ष) आणि त्यांची पत्नी दिलनाज यांच्यात भांडण चालू होते. हे भांडण सोडवण्यासाठी पत्नी दिलनाज यांचे वडील व भाऊ मोहम्मद अतीक अन्सारी (28 वर्ष) आले होते. आमचे भांडण सोडवण्यासाठी का आले? हा राग मनात धरून रागाच्या भरात मोहम्मद अतिक अन्सारी याच्या पोटावर जोराची लाथ मारून तसेच त्याच्या डोक्यावर गंभीरित्या जखमी करून त्याला जिवे ठार मारण्याची घटना भिवंडीच्या शांतीनगर परिसरात घडली आहे. फिर्यादी शफीक इजाज अहमद अन्सारी (31 वर्ष) ‌ यांनी मयत भावावर झालेल्या प्राणघात हल्ल्याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1),115 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जावेद कलीम खान याला अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0