क्राईम न्यूजमुंबई

Online Task Fraud News : टास्क फ्रॉडच्या नावाखाली फसवणूक, ओडिशा राज्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

Online Task Fraud News: ऑनलाइन फसवणूक, टास्क पूर्ण केल्यास आर्थिक फायदा, आर्थिक आमिषाला बळी, तब्बल 43 लाखाची आर्थिक फसवणूक

मुंबई :- आर्थिक फसवणुकीमध्ये (Online Fraud) गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट, ट्रेडिंग ॲप, व्हाट्सअप इंस्टाग्राम youtube यांच्या लाईक कमेंट शेअर हॉटेल गुगल रेडिंग यांसारखे पार्ट टाइम जॉब चा टास्क (Online Job Task) देऊन देऊन आर्थिक फसवणूक (Financial Fraud) झाल्याच्या गेल्या काही दिवसांपासून घटना समोर येत आहे. मुंबई सायबर क्राईम विभागा मध्ये एका फिर्यादीने तक्रार केली की,त्याला EADCOSMOS SOCIAL MEDIA MARKETING COMPANY या कंपनीतून ह्यूमन रिसर्च डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगून पार्ट टाइम जॉब देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादी याला instagram अकाउंट च्या यु आर एल लिंक्स व युजरनेम पाठविले. फिर्यादी येणे instagram अकाउंट फॉलो करून त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगून टास्क पूर्ण केल्यास फिर्यादी येणे instagram अकाउंट फॉलो करून त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगून टास्क पूर्ण करण्या सांगितले होते. फिर्यादी यांना त्यांनी दिल्याप्रमाणे टास्क पूर्ण केल्यानंतर आरोपी फिर्यादी यांनी यापुढील टास्क हे प्रीपेड असल्याचे सांगितले. त्याप्रमाणेच फिर्यादी याने वेळोवेळी टास्क पूर्ण करण्यासाठी फिर्यादी यांना भरघोस नफा देण्याचे आमिष देऊन टास्क करतेवेळी वेगवेगळे कारणे देऊन वेगवेगळ्या खात्यावरुन फिर्यादी याच्याकडून तब्बल 44 लाख 62 हजार 731 एवढी रक्कम गुंतवण्यास सांगितले.

आर्थिक आमिषाला बळी

फिर्यादी याला कोणत्याही प्रकारची गुंतवलेले रक्कम आणि नफा परत न आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी मुंबईच्या सायबर विभागाला आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 419,420,465,468,471,120ब भादवी‌ कलम सह 66 (क), 66 (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 अन्वये सायबर पोलीस ठाणे (Mumbai Cyber Police) बीकेसी मुंबई येथे तक्रार नोंदवण्यात आली होती. (Mumbai Police Team Arrested Online task job Fraudster From Odisha)

ओडिशा राज्यातून आरोपींना अटक

पोलिसांनी तांत्रिक व पारंपारिक पद्धतीने गुन्ह्यातील आरोपींविषयी माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली. गुन्ह्यातील आरोपी हे ओडीशा राज्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सायबर पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव, नितीन गच्चे, केशव तकीक, पोलीस शिपाई संग्राम जाधव, अभिजीत देसाई यांचे एक पथक ओडीशा राज्यात रवाना करण्यात आले . पोलिसांनी कौशल्य पूर्वक तपासणी करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून पाच आरोपींना अटक केले होती. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तब्बल 11 मोबाईल,47 बँकेचे वेगवेगळे पासबुक, 23 बँकेचे चेक बुक,104 विविध बँकेचे एटीएम कार्ड 10 सिम कार्ड आणि एक बँक मॅनेजर स्टॅम्प हस्तगत करत करुन एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. (Mumbai Police Team Arrested Online task job Fraudster From Odisha)

अटक आरोपींची नावे

1.प्रमोदकुमार रविंद्र बेहेरा, (26 वर्ष)

2.राकेशकुमार हरिराम चौधरी (25 वर्ष)

3.सूर्वेदू निरंकर दास (30 वर्ष)

4.जयदिप अमरकुमार परिडा (24 वर्ष),

5.मनोजकुमार अदिचरम राउत (29 वर्ष)

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, (Mumbai CP Vivek Phansalkar) विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (सायबर गुन्हे) दत्ता नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (सायबर) अबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे) दत्ताराम चव्हाण यांचे नियंत्रणाखाली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सविता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव,नितीन गच्चे, पोलीस हवालदार प्रशांत भुवड, पोलीस शिपाई केशव तकिक, संग्राम जाधव,अभिजीत देसाई यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0