मुंबई

Bhiwandi Crime News : भिवंडीत मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त

•बेकायदेशीर रित्या तंबाखूजन्य पदार्थाचे वाहन करणाऱ्या आरोपीला अटक, ७० लाखाहून अधिक किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जपतो

भिवंडीत :- महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना तरी शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या सर्रास तंबाखूजन्य पदार्थाचे वाहतूक करणार याची घटना दिवसां दिवस समोर येत आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ दारू पैसे आणि तंबाखूजन्य पदार्थ यांसारख्यांवर खरडी नजर असून याच्या विरोधात पोलिसांनी बडगा उभारला आहे. अन्नसुरक्षा तंबाखू प्रतिबंध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. Bhiwandi Crime News

04 एप्रिल रोजी दुपारी 4.35 चे सुमारास, नारपोली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस हवालदार पाटील व त्यांचे पथकास मिळालेल्या माहितीवरून, दापोडा रोड, भिवंडी येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी आरोपी अजयकुमार श्यामपाल सिंग, (28 वर्षे) याने टाटा कंपनीचा कंटेनर वाहनातुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थ सनकी एस.एन.के.गुटका, रॉयल 1000, विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण 70 लाख 30‌ हजार 600 रूपये किमंतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 328,188,272,273,269 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 23,26(2)(iv),27,30(2)(अे) सह शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अजयकुमार श्यामपाल सिंग, (28 वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहे. Bhiwandi Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0