Bhiwandi Crime Branch Arrested Man With Gun : भिवंडी गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई, विक्रीसाठी आणलेल्या आणि विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली आहे.
भिवंडी :- विक्रीसाठी आणलेल्या एक देशी बनावटीच्या पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसे मुद्देमालासह भिवंडी गुन्हे शाखा कक्ष-2 Bhiwandi Crime Branch Unit 2 पोलिसांनी आरोपीला रामनगर येथून अटक केली आहे. पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र विक्री आणि बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुर मोहम्मद अन्सारी (वय 21, रा.गायत्री नगर भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. 8 नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास त्याच्या रामनगर पाण्याची टाकीजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-2 पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून नुर मोहम्मद अन्सारी याची अंगझडती घेतली असता 1 पिस्तुल, 1 काडतुसे आढळून आली. विनापरवाना शस्त्र बालगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1 गुन्हे शेखर बागडे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अमोल इंगळे, उमेश ठाकुर, भावेश घरत, सचिन सोनवणे, विजय कुंभार, नितीन बैसाणे, रविंद्र साळुंके यांनी केली आहे.