Jalna Bribe News : महावितरण आणि इकोझन सोलर कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक
ACB Arrested Mahavitran And Eco zone Company Man For Taking Bribe : कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 1 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
जालना :- महावितरण आणि इकोझन सोलर Mahavitran And Eco zone Solar Companyकंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच Taking Bribe घेताना अटक करण्यात आली आहे. सोलर पॅनल लावण्यासाठी जागेचा सर्वे करण्याकरिता एक हजार रुपयांचे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना युनिट यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. समाधान धोंडीबा लोखंडे (30 वय, फिटर, इकोझन सोलर कंपनी), कौसर नसीर शेख (30 वय, कंत्राटी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ) असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. Jalna Latest bribe news
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांनी सोलार पॅनल मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असुन सोलार पॅनल लावण्यासाठी जागेचा सर्वे करून देण्याचे काम आरोपी समाधान लोखंडे यांचेकडे आहे. तक्रारदार यांचे सोलार पॅनल मिळण्यासाठीचे ऑनलाईन अर्जावरून त्याबाबतचा सर्वे करून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे आरोपी समाधान लोखंडे (इकोझन सोलार कंपनी कर्मचारी) 1,000 रुपये लाचेची मागणी करुन, लाचेची रक्कम शेख यांचेकडे देण्यास सांगितले. शेख महावितरणाचा कंत्राटी कर्मचारी याने तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम एक हजार रुपये स्वीकारले असता त्यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे.दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन त्यांचेवर पोलीस ठाणे टेंभुर्णी जि.जालना Police Station Tembhurni District Jalna येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. Jalna Latest bribe news
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा अधिकारी- बाळु एस. जाधवर, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक – पोलीस हवालदार गजानन घायवट, गणेश चेके, भालचंद्र बिनोरकर. यांनी कारवाई केली आहे. Jalna Latest bribe news